
टोकियो: भारतीय पुरुष हॉकी संघाने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वाचा- ग्रुप ए मध्ये भारताने चार पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा ३-१ असा पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा ७-१ असा पराभव झाला. तिसऱ्या लढतीत भारताने स्पेनवर विजय मिळवला आणि आज (२९ जुलै) अर्जेंटिनाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. वाचा- या सामन्यात दोन्ही संघांना पहिल्या हाफमध्ये गोल करता आला नाही. ४३व्या मिनिटाला भारताकडून वरूण कुमारने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. वाचा- हा सामना बरोबरीत सुटेल की काय असे वाटत असताना विवेक सागर प्रसादने गोल करून २-१ अशी आघाडी मिळून दिली. त्यानतंर भारताच्या हरमनप्रीत कौरने पेनाल्टी कॉर्नरवर गोल करून आघाडी ३-१ अशी केली. वाचा- ग्रुप ए मधील भारताची अखेरची लढत यजमान जपानविरुद्ध होणार आहे. ही लढत उद्या ३० जुलै रोजी होईल.