Video: भारतीय खेळाडूने घेतलेला कॅच पाहून अंपायर झाले हैराण, दोन वेळा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 29, 2021

Video: भारतीय खेळाडूने घेतलेला कॅच पाहून अंपायर झाले हैराण, दोन वेळा...

https://ift.tt/3zJdPYU
कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. भारतीय संघातील खेळाडू क्रुणाल पंड्याला करोनाची लागण झाल्याने दुसरी लढत मंगळवार ऐवजी बुधवारी झाली आणि या लढतीत श्रीलंकेने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १३२ धावा केल्या होत्या. लंकेने हे लक्ष्य चार विकेट राखून पार केले. वाचा- आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लंकेचा कर्णधार दासुस शनाकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताला १३२ धावात रोखले. या सामन्यात श्रीलंकेच्या डावात भारताच्या राहुल चाहरने एक शानदार कॅच घेतला ज्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- लंकेच्या डावातील तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर अविष्का फर्नांडोने पूर्ण ताकत लावून चेंडू फ्लिक केला. चेंडू उंच गेला होता आणि सीमा रेषेच्या बाहेर जाणार होता इतक्यात राहुल चाहरने हा चेंडू थांबवला. फार लांबून पळत आलेल्या राहुलने प्रथम चेंडू पकडला आणि तो सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून रोखला. त्यानंतर चेंडू बाहेर टाकला आणि पुन्हा कॅच केला. वाचा- राहुल चाहरचा हा कॅच पाहून अंपायर्स देखील हैराण झाले. त्यांना दोन वेळा हा कॅच पाहावा लागला आणि त्यानंतर फर्नांडोला बाद दिले गेले. त्याने १३ चेंडूत ११ धावा केल्या.