माजी पालिका आयुक्त नलिनाक्षन यांचं निधन; घरात पूजा करत असताना कपड्यांनी घेतला पेट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 10, 2021

माजी पालिका आयुक्त नलिनाक्षन यांचं निधन; घरात पूजा करत असताना कपड्यांनी घेतला पेट

https://ift.tt/3yF1q7O
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पालिकेचे माजी आयुक्त (७९) यांचे शुक्रवारी पहाटे भायखळ्यातील मसिना रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. बुधवारी सकाळी राहत्या घरी पूजा करत असताना त्यांच्या लुंगीने पेट घेतला आणि त्यात ते ८० ते ९० टक्के भाजले होते. त्यांना तातडीने मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय सनदी सेवेतील (आयएएस) १९६७ च्या तुकडीचे अधिकारी असलेले नलिनक्षान यांनी १९९९-२००१ कालावधीत मुंबई पालिकेत आयुक्तपद भूषविले होते. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव पदासह अन्य विभागांचा कार्यभार सांभाळला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेल्या भुयारी मार्गाचे काम नलिनाक्षन यांच्या आयुक्त कार्यकाळात करण्यात आले होते. येथील 'ए' मार्गावरील शर्विविल इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. नलिनाक्षन हे नेहमीप्रमाणे घरातील देवघरात पूजा करत असताना त्यांच्या लुंगीने पेट घेतल्याने ते भाजले. त्यावेळी, देवघर असलेली खोली आतून बंद असल्याने त्यांच्या बचावासाठी काही करणे शक्य झाले नाही, अशी माहिती त्यांचा मुलगा श्रीजीत यांनी दिली.