सचिनच्या घरी आला नवा पाहूणा; सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 28, 2021

सचिनच्या घरी आला नवा पाहूणा; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

https://ift.tt/3BIt4TT
मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील तो चर्चेत असतो. निवृत्तीनंतर सचिन अनेक उपक्रम किंवा वैयक्तीक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. याआधी ट्रेनिंग, खास काही पदार्थ तयार करतानाचे व्हिडिओ सचिनने शेअर केले होते. आता मात्र सचिनने एक खास फोटो शेअर केला आहे. ज्याचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. वाचा- सचिन तेंडुलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा नवा पाहुणा अन्य कोणी नसून सचिनचा नवा श्वान आहे. सचिन त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याचा फोटो शेअर करताना सचिन म्हणतो, स्पाइक माझा नवा पार्टनर आहे. आज सोशल मीडियावर त्याचा पहिला फोटो शेअर करत आहे. वाचा- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्राण्यांविषयी खास प्रेम आहे. या पोस्टमधून सचिनने या पुढे देखील स्पाइक सोबत अनेक फोटो शेअर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. वाचा- सचिनने शेअर केलेल्या फोटोत त्याने स्पाइकला उचलून घेतले आहे. या फोटोवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिनचा घरातील हा नवा पाहुणा सर्वांना आवडलाय. अनेकांना स्पाइक हे नाव देखील खुप आवडले आहे. सचिनचा स्पाइक सोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.