
मुंबई : कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव पुन्हा एकदा ४८००० रुपयांच्या दिशेनं वाटचाल करू लागला आहे. आज बुधवारी सोने आणि चांदीने सकारात्मक सुरुवात केली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव ७० रुपयांनी वधारला तर चांदीमध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४७६२९ रुपये प्रती १० ग्रॅम आहे. त्यात ५६ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७६८९ रुपये इतका वाढला होता. कालच्या मोठ्या घसरणीतून आज चांदी सावरली आहे. आज चांदीचा भाव २७९ रुपयांनी वधारला असून तो ६६३३५ रुपये झाला आहे. एमसीएक्सवर मंगळवारी बाजार बंद होताना सोने ६३ रुपयांनी वधारले होते. सोन्याचा भाव ४७५२४ रुपयांवर स्थिरावला होता. चांदीमध्ये मात्र १००१ रुपयांची घसरण झाली आणि चांदीचा भाव ६६११२० रुपयांवर बंद झाला होता. Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी सोने दरात घसरण झाली आहे. आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६५० इतका आहे तर २४ कॅरेटचा भाव ४७६५० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०९९० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०३० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१३० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१८० रुपये आहे. नाणेनिधीने मंगळवारी वलर्ड इकॉनॉमिक आऊटलूक जाहीर केले. यात मार्चनंतर भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. यामुळे वृद्धीमध्ये अडथळा निर्माण झाला. करोनाच्या प्रकोपानंतर अर्थव्यवस्था सावरण्याचा वेग कमी झाला असल्याचे नाणेनिधीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. नाणेनिधीने जीडीपीच्या सुधारित अंदाज वर्तवला आहे. जो आधीच्या जीडीपीच्या तुलनेत कमी आहे. चालू वर्षी ९.५ टक्के राहील, असा नवा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. तर पुढील आर्थिक वर्षी तो ८.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.