ईडी करणार सचिन वाझेंची चौकशी; 'हे' आहे कारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 9, 2021

ईडी करणार सचिन वाझेंची चौकशी; 'हे' आहे कारण

https://ift.tt/3qVwTjB
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई माजी गृहमंत्री यांच्याविरोधातील मनी लाँडरिंगच्या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी यांची तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाला () दिली. वाझे सध्या अँटिलिया विस्फोटके व मनसुख हिरन हत्या प्रकरणात नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. ईडीने देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली होती. वाझेंनी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बामालकांकडून चार कोटी ७० लाख रुपये वसूल करून दोन हप्त्यांमध्ये शिंदे यांच्याकडे दिले होते, अशी कबुली शिंदे व पलांडे यांनी दिल्याचा दावा ईडीने केला आहे. त्याअनुषंगाने वाझेंची चौकशी करायची असल्याने तळोजा तुरुंगात जाऊन त्यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज ईडीने केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केला असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.