सोन-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा कमॉडिटीचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 26, 2021

सोन-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा कमॉडिटीचा भाव

https://ift.tt/3zBPdkG
मुंबई : करोना नियंत्रण आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात सोन्याची विक्री केली होती. सोने आणि चांदीच्या किमतीत यामुळे घसरण झाली. मात्र त्या पडझडीतून दोन्ही धातू सावरले आहेत. आज सोमवारी सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या सोन्याचा भाव ४७६७१ रुपये असून त्यात १३६ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७१९९ रुपये असून त्यात १७५ रुपयांची वाढ झाली आहे. याआधी शुक्रवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील घसरण झाली. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०८ रुपयांच्या घसरणीसह ४७५२६ रुपयांवर स्थिरावला होता. तर चांदीमध्ये ३२४ रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा ६७०५० रुपयांवर बंद झाला. Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी सोने दरात कोणताही बदल झाला नाही. आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० इतका आहे तर २४ कॅरेटचा भाव ४७८७० रुपयांवर कायम आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१११० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१६० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९५० रुपये आहे.जागतिक पातळीवर मात्र सोने दरात किंचित घसरण आहे. जागतिक पातळीवर सोनंच भाव ०.१ टक्क्याने कमी झाला आणि तो १७९९.८९ डॉलर झाला. यूएस गोल्ड फ्युचर्समध्ये देखील ०.२ टक्के घसरण झाली असून सोन्याचा भाव १७९८.९० डॉलर प्रती औंसवर स्थिरावला.