पुणे मेट्रोबाबत अजित पवारांची मोठी घोषणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 30, 2021

पुणे मेट्रोबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

https://ift.tt/3zQLDU1
पुणे: 'पुणे हे देशातलं सर्वात चांगलं, सुरक्षित व सर्व सोयींनी युक्त असं शहर बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मेट्रो हा त्याचाच भाग असून पुण्याच्या आधुनिक इतिहासात मेट्रोची नोंद होईल,' असा विश्वास उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज व्यक्त केला. 'पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी अजिबात कमी पडू देणार नाही,' अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. पुणे मेट्रोची पहिली औपचारिक 'ट्रायल रन' आज वनाज कारशेड ते आनंदनगर दरम्यान पार पडली. अजित पवारांनीच यावेळी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मेट्रो प्रकल्पाची माहिती दिली. 'स्वारगेट ते कात्रज ओव्हरहेड मेट्रो शक्य नाही. हा प्रकल्प भूमिगतच करावा लागेल. या प्रकल्पासाठी महापालिकेनं पुढाकार घ्यावा,' असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचं उद्दिष्ट आहे. निगडी ते कात्रज असा मार्ग झाल्यास अधिक फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं. वाचा: 'शहरातील वाढती गर्दी, प्रदूषण, कोंडीवर मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. निवडणुकांनंतर राजकीय विचार बाजूला ठेवून विकासकामाला महत्त्व देण्याची आमची भूमिका आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झालं आहे. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात मेट्रोला मानाचं स्थान असेल,' असं अजित पवार यावेळी म्हणाले. 'सुरक्षेच्या दृष्टीनं नद्यांना भिंती बांधणं गरजेचं' पुरामुळं होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नद्यांना भिंती घालण्याचा विचार अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मांडला होता. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अजित पवारांच्या या वक्तव्यावर टीकाही झाली होती. अजित पवार यांनी आज त्यावर पुन्हा एकदा भाष्य केलं. 'सुरक्षेच्या दृष्टीनं नद्यांना भिंती बांधणं गरजेचं आहे. सध्या अनेक ठिकाणी नद्यांना रिटेनिंग वॉल आहेत,' याकडं त्यांनी लक्ष वेधलं. वाचा: