खळबळजनक! महिला पोलिस कर्मचाऱ्याचे ३० नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 26, 2021

खळबळजनक! महिला पोलिस कर्मचाऱ्याचे ३० नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल

https://ift.tt/3eRpFIE
: आधुनिक काळात इंटरनेटचे जवळपास प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात अनेक फायदे होतात. मात्र याच इंटरनेटचा गैरवापर करून एखाद्याचं आयुष्यही उद्धवस्त केलं जाऊ शकतं. बुलडाणा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने आपले खासगी फोटो जीमेल अकाऊंटवर ठेवले असता अज्ञात व्यक्तीने ते अकाऊंट हॅक करून सदर महिला कर्मचाऱ्याचे नग्न फोटो व्हायरल (Female police officer nude photo viral) केल्याची घटना घडली आहे. बुलडाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्या मोबाईल नंबर धारकावर विनयभंगसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे नग्न फोटो तिच्या जीमेल आयडीवर सेव्ह होते. हा मेल आयडी हॅक करुन जवळपास ३० नग्न फोटो पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मैत्रिणीच्या मोबाईल नंबरवर अश्लील संदेश लिहून १७ जुलै रोजी पाठवण्यात आले. ही बाब पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच तिने १८ जुलै रोजी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरुन अज्ञात मोबाईल धारक आरोपीवर विनयभंगाच्या कलम ३५४, ३५४ (ड), आयटीअ‍ॅक्टचे ६६ (सी), ६६ (ई), ६७ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात येणार आहे. तपासाअंती सदर महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो कोणी व्हायरल केले हे समोर येणार आहे.