खळबळ! त्रिपुराच्या १५१ नमुन्यांपैंकी ९० हून अधिक 'डेल्टा प्लस व्हेरियंट'बाधित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 10, 2021

खळबळ! त्रिपुराच्या १५१ नमुन्यांपैंकी ९० हून अधिक 'डेल्टा प्लस व्हेरियंट'बाधित

https://ift.tt/3qZPMSk
आगरतळा : शुक्रवारी राज्यातून पश्चिम बंगालमध्ये ''साठी पाठवण्यात आलेल्या १५१ नमुन्यांपैंकी तब्बल ९० हून अधिक नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व नमुन्यांमध्ये करोनाचा '' आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. 'डेल्टा प्लस' हा अतिशय वेगानं फैलावणाऱ्या व्हेरियंटमुळे देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्रिपुराचे वैद्यकीय तज्ज्ञांनी यासंबंधी माहिती दिली. त्रिपुरातील कोविड १९ चे एक नोडल अधिकारी डॉ. दीप देव वर्मा यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरातून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पश्चिम बंगालमध्ये १५१ आरटी-पीसीआर नमुने पाठवण्यात आले होते. यातील ९० हून अधिक नमुन्यांत डेल्टा प्लस व्हेरियंटसहीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा चिंतेचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही बुधवारी ३५ राज्य-केंद्रशासित प्रदेशांतील १७४ जिल्ह्यांत SARS-CoV-2 करोना विषाणूचा 'चिंताजनक प्रकार' आढळल्याचं म्हटलं होतं. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यातील सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तेलंगणा, आणि गुजरात या राज्यांत आढळले आहेत. सर्वात अगोदर उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि देवरियामध्ये डेल्टा प्लस कोविड १९ व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले होते. यातील एका ६६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय. डेल्टा प्लस व्हेरियंटविषयी अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीय. अगोदरपेक्षा हा व्हेरियंट अधिक शक्तीशाली झाल्याचं म्हटलंय.