Video: भारताच्या हरलीन देओलच्या कॅचवर जग झाले फिदा; क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्तम कॅच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 10, 2021

Video: भारताच्या हरलीन देओलच्या कॅचवर जग झाले फिदा; क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्तम कॅच

https://ift.tt/3wtKDmz
नवी दिल्ली: भारतीय महिला संघ आणि इंग्लंडचा महिला संघ यांच्यात काल (९ जुलै) पासून तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली. या पहिल्या लढती भारतीय संघाचा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १९ षटकात ४ बाद १६६ धावा केल्या. उत्तरादाखल भारतीय महिला संघाला ८.४ षटकात ३ बाद ५४ धावा करता आल्या. इंग्लंड संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना १८ धावांनी जिंकला. वाचा- या सामन्यात संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेणारी एक घटना घडली आहे. इंग्लंडच्या डावात भारताची हरलीन देओलने एक अफलातून कॅच घेतला. या कॅचने फक्त महिला नाही तर पुरुष क्रिकेट विश्वातील दिग्गजांना हैराण केले. वाचा- इंग्लंडच्या डावात १९व्या षटकात फलंदाज एमी एलन जोन्सने हवेत चेंडू मारला. सीमारेषेवर उभी असलेल्या हरलीनने एथलेटिक्स स्किल दाखवत प्रथम हवेत उडी मारून चेंडूला सीमा रेषेच्या पलिकडे जाण्यापासून रोखले. तिने प्रथम षटकात रोखला आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलिकडून पुन्हा आत उडी मारून चेंडू कॅच घेतला. वाचा- तिच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतक नव्हे तर आयसीसी, भारताचा माजी सचिन तेंडुलकर असे सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. सचिनने तर हा कॅच या वर्षातील सर्वोत्तम कॅच असल्याचे म्हटले आहे. हरलीनच्या या कॅचमुळे एमी एलन जोन्सला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. महिला क्रिकेटमधील आजवरचा हा सर्वोत्तम कॅच मानला जात आहे.