महापुरामुळं घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने १० हजारांची मदत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 27, 2021

महापुरामुळं घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने १० हजारांची मदत

https://ift.tt/3i60zaG
मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती म. टा. प्रतिनिधी, मुंबई: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुरामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून १० हजार रु. देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे, अशा कुटुंबांना तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र व्यक्तींची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत, त्यांना जमीन देऊन त्यांचे एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचे काम केले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.