मुंबईकरांना आज दिलासा; पाहा, 'अशी' आहे करोनाची ताजी स्थिती! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 31, 2021

मुंबईकरांना आज दिलासा; पाहा, 'अशी' आहे करोनाची ताजी स्थिती!

https://ift.tt/37aywks
मुंबई: मुंबईतील दैनंदिन बाधितांच्या रग्णसंख्येत घट झाली असून कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात एकूण ३२३ नव्या रुग्णांचे निदान झाले असून ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार ०८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे नव्या रुग्णसंख्येत घट झाली होऊन मृत्यूंच्या संख्याही कमी झाल्याने आज मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. काल मुंबईत ३४० नव्या रुग्णांचे निदान झाले होते,तर ४०३ रुग्ण बरे झाले होते. तसेच काल मृतांची संख्या १३ इतकी होती तर त्यात आज घट होत ती ७ वर खाली आली आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३४ हजार ४३५ जणांना करोना विषाणूची लागण झाली असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ११ हजार ०७३ इतकी आहे. या बरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्क्यांवर स्थिर आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून तो १ हजार ४३४ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १५ हजार ८८० इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत दिवसभरात झाल्या ३२ हजार २८५ चाचण्या मुंबईत आज दिवसभरात एकूण ३२ हजार २८५ इतक्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ८१ लाख १८ हजार ४३७ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका असून २३ जुलै ते २९ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०५ टक्क्यांवरच स्थिर आहे. मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ३ असून सक्रिय सीलबंद इमारची ५५ आहेत. क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती २४ तासात बाधित रुग्ण - ३२३ २४ तासात बरे झालेले रुग्ण - ३६६ बरे झालेले एकूण रुग्ण - ७११०७३ बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ५०८२ दुप्पटीचा दर- १४३४ दिवस कोविड वाढीचा दर (२३ जुलै ते २९ जुलै)- ०.०५%