पुणे: जमिनीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्यावरून दाखल गुन्ह्यात फरारी माहिती अधिकार कार्यकर्ता याची पत्नी (वय ४९, रा. धनकवडी) हिला बुधवारी गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा अटक केली. बऱ्हाटेला व्हिडिओ बनविण्यात मदत केल्याच्या आरोपावरून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. ( ) वाचा: ठाण्यात सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात संगीता बऱ्हाटे हिला अटक करण्यात आली आहे. विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटे, याच्यासह १३ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बऱ्हाटेच्या संपर्कात राहून कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरून ही अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. संगीता हिला चौकशीसाठी बुधवारी दुपारी तिच्या धनकवडी येथील राहत्या घरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तिच्याकडे रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी केल्यानंतर प्रकरणात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. वाचा: आरोपी सचिन गुलाब धिवार याचा भाऊ यालाही पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र बऱ्हाटे फरारी झाल्यापासून तो त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी बऱ्हाटे याने अकरा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते. त्यामध्ये त्याने साक्षीदार, तक्रारदार, तपास अधिकारी यांच्यावर दबाव आण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच विविध आरोपही केले होते. हे सर्व व्हिडिओ तयार करण्यासाठी पितांबर याने त्याला मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वाचा: