झिका व्हायरसचा धोका; केरळमध्ये १४ रुग्ण, केंद्राची तज्ज्ञांची टीम रवाना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 10, 2021

झिका व्हायरसचा धोका; केरळमध्ये १४ रुग्ण, केंद्राची तज्ज्ञांची टीम रवाना

https://ift.tt/3wzumwp
नवी दिल्लीः करोनाच्या संकटाने जनता त्रासली असताना आता झिका व्हायरसचा ( ) धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे एक दोन नव्हे तर १४ रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात ( ) आला आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता केंद्र सरकारने स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची ६ सदस्यांची एक टीम रवाना केली आहे. ही टीम राज्य सरकारला मदत करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. झिका व्हायरसचे काही रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांची ६ सदस्यांची एक टीम केरळ रवाना करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. यात एम्सच्या तज्ज्ञांचाही समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने आणखी १३ रुग्ण असल्याचं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती केरळ सरकारने दिली आहे. झिका व्हायरसची लक्षणं ही डेंग्यूशी मिळती जुळती आहेत. यात तापस, शरीरावर वळ उमटणं आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक योजना राबवण्याची तयारी करण्यात येत आहे, असं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं. केरळमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण २८ जूनला आढळून आला होता. डास चावल्याने होणाऱ्या या आजाराने २४ वर्षांच्या एका गर्भवती महिलेला संसर्ग झाला होता. या गर्भवती महिलेने कुठलाही प्रवास केलेला नाही. पण तिचे घर तामिळनाडूच्या सीमेवर आहे. झिका व्हायरसने संसर्ग झालेला रुग्ण ७ ते ८ दिवस आजारी पडतो. या व्हायरसचा अधिक परिणाम हा महिलांवर होतो. गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्यास जन्माला येणारे बाळाच्या मेंदुचा विकास झालेला नसतो. ब्राझीलमध्ये २०१५ ला झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी विकृतीसह १६०० हून अधिक बालकांचां जन्म झाला होता. भारतात पहिल्यांदा २०१७ मद्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळला होता. हा व्हायरस असुरक्षित शारिरीक संबंध आणि दुषित रक्तातूनही पसरतो.