जगन्नाथ रथ यात्रेपूर्वी गृहमंत्री अमित शहा गुजरातमध्ये, यात्रा मार्गावर कर्फ्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 12, 2021

जगन्नाथ रथ यात्रेपूर्वी गृहमंत्री अमित शहा गुजरातमध्ये, यात्रा मार्गावर कर्फ्यू

https://ift.tt/3e76073
अहमदाबाद : भगवान जगन्नाथाची १४४ वी रथ यात्रा आज अहमदाबादच्या क्षेत्र स्थित जगन्नात मंदिरापासून काढली जाणार आहे. ही रथ यात्रा निघण्यापूर्वी सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री आज गुजरातमध्ये दाखल झाले. जगन्नाथ मंदिरात दाखल होत त्यांनी पहाटेच आरतीत सहभाग घेतला. अहमदाबादेत रथ यात्रेसाठी सीमित संख्येत काही निश्चित लोकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलीय. या दरम्यान करोना संक्रमणाविरुद्ध सगळ्या दिशा-निर्देशांचं पालन केलं जाणार आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर या रथ यात्रेत केवळ तीन रथ आणि दोन इतर गाड्या सहभागी होतील. याशिवाय कोणत्याही वाहनाला यात्रेत सहभागी होण्याची परवानगी नाही. तसंच यंदा गायन मंडळ, आखाडे, हत्ती किंवा सजलेले ट्रक अशा प्रकारच्या लवाजम्याला परवानगी नाकारण्यात आलीय. यात्रा मार्गावर कर्फ्यू यंदा यात्रा केवळ पाच तासांत पूर्ण करण्यात येईल. रथ यात्रेच्या मार्गात नागरिक गोळा होऊ नयेत यासाठी संपूर्ण मार्गावर सकाळपासून ते दुपारपर्यंत कर्फ्यू लावण्यात आले आहेत. सारसपूरमध्येही जेवण्याच्या वेळी लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलीय. दुपारी रथ यात्रा पुढे गेल्यानंतर या भागातून कर्फ्यू हटवण्यात येणार आहे. परंपरेनुसार, खलासी समुदायाचे तरुण भगवान जगन्नाथसहीत तीन रथ हाकतील. यंदा केवळ ६० तरुणांना रथ हाकण्याची परवानगी देण्यात आलीय. रथ यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणं अनिवार्य आहे. याशिवाय करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात उच्च न्यायालयानं रथ यात्रा काढण्याची परवानगी नाकारली होती. पारंपरिकरित्या रथयात्रा सकाळी ७.०० वाजता मंदिरातून प्रस्थान करते तसंच रात्री ८.०० वाजेपर्यंत ती ४०० वर्ष जुन्या मंदिरापर्यंत पोहचते.