विजय मल्ल्या दिवाळखोर घोषित, लंडन हायकोर्टाचा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 27, 2021

विजय मल्ल्या दिवाळखोर घोषित, लंडन हायकोर्टाचा निर्णय

https://ift.tt/3x5PjiU
लंडनः बँकांची कोट्यवधींची फसवणूक करून फरारी झालेला मद्य सम्राट विजय मल्ल्या ( ) याला लंडनच्या हायकोर्टाने दिवाळखोर ठरवलं आहे. याचा फायदा भारतीय बँकांना होणार आहे. विजय मल्ल्याची ( ) मालमत्ता सहजपणे बँकांना आता जप्त करता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात काही भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला आहे. विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावं, अशी मागणी बँकांच्या संघटनेने कोर्टात याचिकेतून केली होती. भारतीय बँकांच्या या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. लंडनच्या हायकोर्टाने आपला निर्णय देत विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं. लंडन हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा एकमेवर मार्ग आता मल्ल्याकडे उरला आहे. मल्ल्याकडून लवकरच या निर्णयाविरोधात कोर्टात आव्हान दिले जाईल, असं बोललं जातंय. पण यानिर्णयामुळे बँकांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करून कर्ज वसुलीसाठी ताकद मिळेल. किंगफिशर एअरलाइन्स डबघाईला गेल्याने विजय मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बँकांकडून ९९९० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण या कर्जाची परतफेड मल्ल्या करू शकला नाही. यानंतर एसबीआयच्या नेतृत्वात १३ बँकांच्या संघटनेने कर्ज वसुलीसाठी करत मल्ल्याच्या हस्तांतराची मागणी केली होती. मनी लाँड्रींगविरोधी कायद्यानुसार किंगफिशर एअरलाइन्स जप्त केलेल्या शेअर्सच्या विक्रीतून एसबीआयच्या नेतृत्वातील कर्जदात्यांनी ७९२.११ कोटी रुपये जप्त केले होते. ईडीकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या प्रकरणी जवळपास ५८ टक्के रक्कम बँका आणि सरकारला परत मिळाली आहे, असं ईडीने म्हटलं होतं.