
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा आणि दहशतवाद्यांत चकमक घडून आली. पोलिसांकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात हंजिन गावात सुरक्षादलाकडून राबवण्यात येतेय. या भागात काही लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. सुरक्षा दलाचे जवान परिसरात उपस्थित असल्याचं लक्षात आल्यानंतर दहतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षादलाकडूनही योग्य प्रत्यूत्तर दिलं जातंय. या भागात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दोन्ही बाजुंना अद्याप कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती मिळतेय. यापूर्वी २७ जून रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या (SPO)घरात घुसून संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एसपीओसहीत त्यांच्या पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येतंय.