Tokyo Olympic 2020 : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; पदकासाठी हवाय फक्त एक विजय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 29, 2021

Tokyo Olympic 2020 : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; पदकासाठी हवाय फक्त एक विजय

https://ift.tt/3i7uDmy
टोकियो: भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज (२९ जुलै) रोजी झालेल्या सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट २१-१५, २१-१३ असा पराभव केला. वाचा- सिंधूने राउंड १६च्या फेरीत शानदार खेळ केला. हा तिचा सलग तिसरा विजय ठरला आहे. मियाने सिंधूला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूने आक्रमक खेळ केला आणि सलग दोन गेम जिंकत सामना जिंकला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित करण्यासाठी सिंधूला आता फक्त एक विजय हवा आहे. सिंधू अंतिम ८ मध्ये दाखल झाली आहे. वाचा- काल (२८ जुलै) सिंधूने राउंड ३२ मधील लढतीत सिंधूने हाँगकाँगच्या एनवाई चेयुंगचा २१-९, २१-१६ असा पराभव केला होता. तर त्याआधी पहिल्या फेरीत तिने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव केला होता. वाचा- पदकतालिकेत सध्या जपान १३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य पदकासह पहिल्या तर चीन १२ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका ११ सुवर्ण, ११ रौप्य आणि ९ कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य पदकासह ४५व्या स्थानावर आहे.