
मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ()आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ()यांच्यात होणाऱ्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे- भाजपची युती होणार का?, अशी चर्चा सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी या भेटीबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. आज सकाळी अकराच्या दरम्यान चंद्रकांत पाटील राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतील. याभेटीत युतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. याआधीही चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंचं कौतुक केल्यानंतर हे दोन पक्ष राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार का, या चर्चेला बळ मिळालं होतं. यावर चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. वाचाः 'भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता नाहीच. मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं महत्त्वाचं असतं म्हणून मी राज ठाकरेंची भेट घेणार आहे,' असं चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केलं होतं. त्यामुळं आजच्या भेटीत भाजप- मनसेदरम्यानच्या युतीबद्दल चर्चा होणार नसल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 'ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप ठाम आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील गोंधळ सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ देणार नाही,' असं पाटील यांनी म्हटलं आहे. वाचाः मनसे - भाजप युतीची चर्चा शिवसेनेला शह देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला एका चांगल्या मित्रपक्षाची आवश्यकता भासत असून त्याला तो मित्र मनसेच्या रुपात दिसू लागल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप आपण पाहिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मी त्या क्लिप पाहिल्यात. त्यांच्या भाषणातील परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेबद्दल काही शंका आहेत. त्या राज यांना भेटून विचारेन. मी माझं म्हणणं त्यांच्यासमोर ठेवेन, असं चंद्रकांत पाटील यांनी या आधी स्पष्ट केलं होतं. वाचाः