महिला हॉकी संघाचे स्वप्नभंग; कांस्यपदक लढतीत ग्रेट ब्रिटनकडून पराभव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 6, 2021

महिला हॉकी संघाचे स्वप्नभंग; कांस्यपदक लढतीत ग्रेट ब्रिटनकडून पराभव

https://ift.tt/3CjJvX1
टोकियो: ऑलिम्पिक २०२० मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघांना कांस्यपदकाच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. आज ६ ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत ग्रेट ब्रिटनने त्यांचा ४-३ असा पराभव केला. याआधी भारतीय हॉकी संघाने १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा महिला संघाने चौथा क्रमांक पटकावला होता. कालच भारताच्या पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. पुरुष संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते. पहिल्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने गोल करून १-० अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघ बॅकफूटवर दिसत होता. या क्वॉर्टरमध्ये भारताने गोल केला नसला तरी भारताची गोलकीपर सविताने ४ गोल सेव्ह केले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने पुन्हा एकदा गोल करून आघाडी २-० अशी केली. भारती संघ अडचणीत दिसत असताना २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरने भारताने पहिला गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला गुरजीतने पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करून बरोबरी केली. दुसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना भारताच्या वंदना कटारियाने तिसरा गोल करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. २-०ने पिछाडीवर असलेल्या भारताने आता ३-२ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या हाफचा खेळ संपला तेव्हा भारताकडे ३-२ अशी महत्त्वाची आघाडी होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने गोल केला आणि भारताविरुद्ध ४-३ अशी आघाडी मिळवली. त्यानतंर त्यांनी भारताला गोल करू दिला नाही. भारताकडून झालेले गोल पहिला गोल- २५व्या मिनिटाला, गुरजीत कौर दुसरा गोल- २६व्या मिनिटाला-गुरजीत कौर तिसरा गोल- २९व्या मिनिटाला- वंदना कटारिया