मुंबई- बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता यांचं आज ८ जुलै रोजी निधन झालं. लाइफ लाइन इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होत होता. यासंबंधी उपचारांसाठी त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे त्यांचं निधन झालं. अशोक पंडित यांनी अनुपम यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'दिग्गज अभिनेता अनुपम श्याम यांचं मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे निधन झालं. हे सिनेसृष्टी आणि टीव्ही जगताचं मोठं नुकसान आहे.'