सिंघम अधिकारी शिवदीप लांडेंचे फेसबुक अकाउंट हॅक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 25, 2021

सिंघम अधिकारी शिवदीप लांडेंचे फेसबुक अकाउंट हॅक

https://ift.tt/3zhO6XR
म. टा. खास प्रतिनिधी, पोलिस दलामध्ये सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेले एटीएसचे यांचे फेसबुक अकाउंट सायबर हॅकरनी हॅक केले आहे. स्वत: लांडे यांनीच समाजमाध्यमांवरून याबातची माहिती दिली आहे. फेसबुकवर लांडे यांचे सुमारे साडेसात लाख फॉलोअर आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांचेही अकाउंट हॅक होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) शिवदीप लांडे हे पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पोलिस दलातील धडाकेबाज कारवाईमुळे लांडे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळेच त्यांचा पोलिस दलात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. समाजमाध्यमांवरही लांडे यांचे लाखो फॉलोअर आहेत. याच संधीचा फायदा घेत हॅकर्सनी लांडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले आहे. लांडे यांच्या फेसबुक पेजचे अॅडमीन मनजीत विशाल हे आहेत. मात्र १९ ऑगस्टला हॅकरनी त्यांना बाहेर काढून लांडे यांच्या अकाउंटवर ताबा मिळवला. फेसबुककडेही तक्रार आपल्या नावाचा वापर करून कोणीही फेसबुक मित्रांची दिशाभूल करू नये किंवा कुणी आर्थिक फसवणूक करू नये, यासाठी लांडे यांनी समाजमाध्यमावरून याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात लांडे यांनी फेसबुककडे तक्रारही केली आहे.