डोक्यावर गुरुग्रंथ साहिब, १० किलोमीटरचा भयानक रस्ता, तालिबान्यांच्या तावडीतून असे बाहेर आले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 24, 2021

डोक्यावर गुरुग्रंथ साहिब, १० किलोमीटरचा भयानक रस्ता, तालिबान्यांच्या तावडीतून असे बाहेर आले

https://ift.tt/3gpha8s
नवी दिल्लीः तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती बिकट झाली. यामुळे भारतीयांसह अनेक विदेशी नागरिक हे भीतीच्या छायेखाली आहेत. यामुळे काबुलच्या गुरुद्वावारात शेखडो शिखांनी आश्रय घेतला आहे. काबुलमधून सोमवारी गुरुग्रंथ साहिबच्या तीन प्रती घेऊन ४६ शीख विमानतळावर पोहोचले. अफगाण शिखांनी ( ) डोक्यावर ठेवून काबुल विमानतळापर्यंतचा १० किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला. तालिबानकडून रस्त्या रस्त्यांवर तपासणी करण्यात येत आहे. अशा स्थितीत विमानतळावर पोहोचणं मोठं आव्हान होतं, अशी माहिती इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंग चंडोक यांनी दिली. 'जो बोले सोह निहाल...' काबुलमधून बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना एअर इंडियाच्या दुशांबे-दिल्ली विमानाने भारतात येत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर काबुलमधून सुरक्षित बाहेर पडल्याचा आनंद होता. विमानात पोहोचताच त्यांचा आनंद दिसून येत होता. 'जो बोले सो निहाल सत श्री अकाल' आणि 'वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह' अशा घोषणा त्यांनी दिल्या. विमानातील याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. विमानात २५ भारतीयांसह ७८ प्रवासी आहेत. 'अजून २०० आणि हिंदू अडकलेत' भारतीय हवाई दलाचे एक विमान युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून पवित्र गुरुग्रंथ साहिबच्या तीन प्रती आणि ७८ नागरिकांना घेऊन भारतात येत आहे. यात ४६ अफगाण आणि हिंदुंचा समावेश आहे. अफगाणिस्तानात अजून २०० शिख आणि हिंदू अडकले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तिथून अनेक नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, असं चंडोक म्हणाले. काबुलमध्ये भायवह परिस्थिती काबुलमध्ये अतिशय भायावह आणि अराजक स्थिती आहे. पुढच्या मिनिटाला काय होईल, हे सांगू शकत नाही. काही विदेशी शीख एनजीओनी आम्हाला बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं. पण त्यांच्या प्रतिनिधींशी अजूनही संपर्क होत नाहीए. फक्त भारत सरकारचे प्रतिनिधी संपर्कात आहेत आणि आम्हाला बाहेर काढत आहेत. एक किंवा दोन शीख दैनिक धार्मिक सेवांसाठी गुरुद्वारामध्ये थांबू शकतात, अशी माहिती एका अफगाण शिखाने दिली.