तिसरी कसोटी: कसे असले हवामान, पावसामुळे खेळ बिघडणार का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 25, 2021

तिसरी कसोटी: कसे असले हवामान, पावसामुळे खेळ बिघडणार का?

https://ift.tt/3gOPYQL
लीड्स: इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ आजपासून तिसरी कसोटी लीड्सवर खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे. मालिकेत पावसाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. जाणून घेऊयात तिसऱ्या कसोटीत कसे असेल हवामान आणि पावसाचा अंदाज... वाचा- मालिकेतील पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे एक ही चेंडू टाकता आला नव्हता. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला नाही. दुसऱ्या कसोटीत भारताने १५१ धावांनी विजय मिळवला. लॉर्ड्स कसोटीत देखील पावसाची भूमिका महत्त्वाची ठरली होती. पाचव्या दिवशी जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा भारताची परिस्थिती खराब होती. पण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी ९व्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. वाचा- तिसऱ्या कसोटीत देखील हवामानाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी काही तास ढगाळ हवामान असेल. त्यानंतर उन पडेल असा अंदाज आहे. दिवसभर तापमान १६ ते २० डिग्रीच्या दरम्यान असेल. कसोटी सामन्याच्या पाच दिवस सुरुवातीचे काही तास ढगाळ हवामान असेल. या दरम्यान तापमान १७ ते २१ डिग्री असेल. पण पावसाची शक्यता नसल्याने चाहते क्रिकेट सामन्याचा आनंद घेऊ शकतील. वाचा- भारताने या मैदानावर (India Record Test) आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी २ मध्ये विजय तर ३ मध्ये पराभव झालाय. एक कसोटी ड्रॉ झाली आहे. टीम इंडियाने १९८६ आणि २००२ साली झालेल्या कसोटीत विजय मिळवला होता. त्याआधी १९७६ साली झालेली कसोटी ड्रॉ झाली होती. वाचा- भारतीय संघात सध्या असलेल्या एकाही खेळाडूने हेडिंग्ले येथे कसोटी मॅच खेळली नाही. कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू या मैदानावर त्यांची पदार्पणाची मॅच खेळतील.