टोकियोत पदक जिंकणारा भारताचा बजरंग वर्ल्ड चॅम्पियशिप खेळू शकणार नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 24, 2021

टोकियोत पदक जिंकणारा भारताचा बजरंग वर्ल्ड चॅम्पियशिप खेळू शकणार नाही

https://ift.tt/3885UIV
नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाला आगामी कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता येणार नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत बजरंगच्या गुढघ्याला दुखापत (लिगामेंट टियर) झाली होती. उपचारासाठी बजरंगला सहा आठवड्यांचा रिहॅबिलिटेशनचा सल्ला दिला आहे. कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन नॉर्वेच्या ओस्लो येथे १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जोपर्यंत रिहॅबिलिटेशनचा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत बजरंगला सराव सुरू करता येणार नाही. वाचा- ऑलिम्पिकच्या आदी जून महिन्यात रशियात एका स्पर्धे दरम्यान बजरंगला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा बजरंगने एमआरआय केला होता आणि मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील क्रीडा वैद्यकिय केंद्राचे प्रमुख डॉ. दिनशॉ परदीवाला यांचा सल्ला घेतला होता. पीटीआयशी बोलताना बजरंग म्हणाला, लिगामेंटची दुखापत आहे. डॉ.दिनशॉने मला सहा आठवड्यांचे रिहॅबिलिटेशन सांगितले आहे. मी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. या वर्षी अन्य कोणतीही रॅकिंग स्पर्धा नाही. या वर्षीचे माझे सत्र संपले आहे. या वर्षी मी अन्य कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. वाचा- बजरंगने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिकंले होते. बजरंगने सांगितले की तो जॉर्जियाचे प्रशिक्षक शाको बेनटिनिडिस यांचे मार्गदर्शन घेणार आहे. शाको सध्या मायदेशात परतले आहेत. कारण भारतीय कुस्ती महासंघाने अद्याप त्यांच्या सोबत करार केला नाही. विदेशी प्रशिक्षकासोबत करार करण्याआधी महासंघ सर्व कुस्तीपटूंचे मत जाणून घेते. बजरंगला शाको यांचे तर टोकियोत कुस्तीमध्ये रौप्यपदक जिंकणारा रवीकुमार दहिया हा रशियाच्या कमाल मालिकोव यांच्याकडून मार्गदर्शन घेतो.