
नवी दिल्ली : आज (शनिवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२८ ऑगस्ट २०२१) ४६ हजार ७५९ आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल ५०९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, देशातील कालच्या एका दिवसातील करोना संक्रमितांपैंकी तब्बल ३२ हजार ८०१ कोविड रुग्ण केवळ केरळमधून समोर आले आहेत. तर केरळमध्ये काल १७९ जणांच्या मृत्यूची नोंद झालीय. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ३७ हजार ३७० वर पोहचलीय. देशात सध्या ३ लाख ५९ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी ३१ हजार ३७४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२
- उपचार सुरू : ३ लाख ५९ हजार ७७५
- एकूण मृत्यू : ४ लाख ३७ हजार ३७०
- करोना लसीचे डोस दिले गेले : १ कोटी ०३ लाख ३५ हजार २९०