गणेशोत्सव विशेष गाड्यांना मिळतोय जोरदार प्रतिसाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 10, 2021

गणेशोत्सव विशेष गाड्यांना मिळतोय जोरदार प्रतिसाद

https://ift.tt/3fNV3bm
म. टा. प्रतिनिधी, अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेला मूळ गावी जाऊन साजरा करण्यासाठी चाकरमान्यांनी जय्यत तयारी केली आहे. उत्सवकाळात कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या आणि एसटी बसगाड्यांना उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गांवरील गाड्यांचे आरक्षण शंभर टक्क्यांपुढे पोहोचले आहे. कोकणासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण १५० अतिरिक्त गाड्यांची घोषणा केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी, पनवेल ते सावंतवाडी, पनेवल ते रत्नागिरी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या गाड्यांची आरक्षणे सोमवारपर्यंत सरासरी शंभर टक्क्यांवर पोहोचले आहे. परतीच्या प्रवासाचे आरक्षणदेखील महिन्याभरापूर्वीच झाल्याने प्रवासी प्रतिसादानूसार रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून मुंबई आणि पुणे विभागातून गौरी-गणपतीसाठी जादा सेवा देण्यात येत आहे. रविवार ८ ऑगस्टपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथून एकूण १०५६ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. यात १६० गाड्यांचे समूह आरक्षण, ३७२ गाड्यांचे पूर्ण आरक्षण, ५२४ गाड्यांचे अंशत: आरक्षण यांचा समावेश आहे. पुणे विभागातून कोकणासाठी ९२ गाड्या सोडण्यात येणार असून त्यांचे अंशत: आरक्षण झाले आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास त्यानुसार अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतील, असे एसटी महामंडळाने सांगितले.