पीएम किसान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात आज २००० रुपये जमा होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 9, 2021

पीएम किसान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात आज २००० रुपये जमा होणार

https://ift.tt/3fMIjBU
नवी दिल्लीः आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा नववा हप्ता जारी करतील. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदन ( ) जारी करण्यात आले आहे. या हप्त्याअंतर्गत १९,५०० कोटी रुपये ९.७५ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर पाठवले जातील. या दरम्यान, पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. पीएम-किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ते थेट बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेद्वारे आतापर्यंत १.३८ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकरी कुटुंबांना पाठवण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा आठवा हप्ता जारी केला होता. पैसे जमा झाले की नाही 'असं' बघा तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का हे शोधण्यासाठी, सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जा. त्यानंतर उजव्या काठावर असलेल्या फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा. बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय उघडलेल्या पेजवर दिसेल, त्यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर एक नवीन पान उघडेल. तुमचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इथे टाका. तुम्ही तुमचा आधार किंवा मोबाईल नंबर टाकताच तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे मिळतील की नाही. योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही नवीन नियमांनुसार सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पात्र मानले जात नाही. याशिवाय १० हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळवणारे डॉक्टर, अभियंते, सीए आणि कर्मचारी देखील या योजनेत सामील होऊ शकत नाहीत.