ठाणे: विभागप्रमुख यांच्यावर शिवसेना शाखेतच हल्ला करण्यात आल्याचा प्रकार आज रात्री ८.३० वाजता येथील भागात घडला. हल्लेखोराने चॉपरने तीन ते चार वार केल्याने जयस्वाल जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ( ) वाचा: श्रीरंग सोसायटीजवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखेत हा प्रकार घडला असून हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयस्वाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर हल्लेखोरही जखमी असल्याचे समजते. आपआपसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. वाचा: