e-RUPI: पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या कसा होणार 'ई-रुपी'चा वापर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 2, 2021

e-RUPI: पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या कसा होणार 'ई-रुपी'चा वापर

https://ift.tt/2WBDu7w
नवी दिल्ली : यांच्या हस्ते आज सायंकाळी ४.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म असलेल्या ''चं उद्घाटन आयोजित करण्यात आलंय. 'ई-रुपी' डिजिटल पेमेंट हे प्लॅटफॉर्म कॅशलेस आणि संपर्क रहीत माध्यम असल्याचं, पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय. () मोदी सरकारनं नेहमीच डिजिटल माध्यमांना प्राधान्य दिलंय. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांतील लाभार्थींपर्यत पोहचण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे सरकारला थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यात मदत होते. सरकारचं हेच ध्येय पुढे घेऊन जाण्याचं काम 'इलेक्ट्रॉनिक वाऊचर'च्या माध्यमातून केलं जाणार आहे, असं पंतप्रधान कार्यालयाकडून म्हटलं गेलंय. काय आहे 'ई-रुपी'? ई-रुपी अशी व्यवस्था आहे, ज्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि सोई-सुविधा पुरवणाऱ्यांच्या दरम्यान कोणत्याही मध्यस्थाचा समावेश नसेल. कारण सरकारकडून वाऊचर देणाऱ्यांद्वारे 'ई-रुपी'मार्फत थेट लाभार्थीच्या मोबाईलवर थेट मदत पाठवली जाईलल. हे एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम आहे. याद्वारे थेट लाभार्थीच्या मोबाईलवर ई-वाऊचर पाठवलं जाईल. क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगवर आधारीत ई-वाऊचरद्वारे लाभार्थींपर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे पोहचवण्यात येतील. उल्लेखनीय म्हणजे, ई-वाऊचरच्या सहाय्याने ट्रान्झॅक्शनसाठी कार्ड, ऑनलाईन बँकिंग किंवा इतर डिजिटल पेमेंट अॅपची गरज भासणार नाही. याद्वारे थेट ट्रान्झॅक्शन म्हणजेच देवाण-घेवाण पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडरला पेमेंट मिळेल. अर्थात जेव्हापर्यंत वाऊचर तुमच्या मोबाईलमध्ये आहे, ते तुमचं आहे. या वाऊचरसाठी एक निश्चित सीमा असेल, या निश्चित वेळेत तुम्हाला वाऊचरचा वापर करावा लागेल. ई-रुपीचा वापर कसा होणार? ई-रुपी ही एक प्री-पेड रक्कम असेल. ही रक्कम एका वाऊचर स्वरुपात असेल. त्यामुळे पेमेंटसाठी उशीर होणार नाही. वाऊचर देणारा थेट लाभार्थ्यापर्यंत हे वाऊचर डिजिटल स्वरुपात पोहचवू शकेल. कोणत्याही मध्यस्थाशिवाय हे पेमेंट पूर्ण होईल. त्यामुळे याचा सर्व्हिस प्रोव्हायडरलाही होईल. लाभार्थ्याला सेवा दिली मात्र त्याचं पेमेंट होण्यात उशीर होतोय, अशी सर्व्हिस प्रोव्हायडरची तक्रार यात उरणार नाही. ई-रुपी पेमेंट निश्चित स्वरुपात होणार याची खात्री लाभार्थी आणि सर्व्हिस प्रोव्हायडरला राहील.