पेटीएमचा जम्बो IPO ; देशातील सर्वात मोठी पेमेंट गेटवे अॅग्रीगेटर, ३३ कोटी ग्राहकांची नोंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 15, 2021

पेटीएमचा जम्बो IPO ; देशातील सर्वात मोठी पेमेंट गेटवे अॅग्रीगेटर, ३३ कोटी ग्राहकांची नोंद

https://ift.tt/3m6nogP
मुंबई : पेटीएमचा १६६०० कोटींचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. या योजनेत ७५ टक्के शेअर हे संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. शेअर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये ४३०० कोटी कंपनीच्या वृद्धीसाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच २००० कोटी नवीन व्यवसायिक विस्तारासाठी वापरले जातील, असे कंपनीने म्हटलं आहे. विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पेटीएमकडे ३३३ दशलक्षांहून अधिक ग्राहक आणि २१ दशलक्ष व्यावसायिक आहेत. ही कंपनी पेमेंटच्या पलिकडे विचार करणारी भारतातील सर्वात मोठी इंटरनेट परिसंस्था उभारत आहे. खरेतर, भारतीय ग्राहकांसाठी पेटीएम हे सर्व डिजिटल कामांसाठी समानार्थी ठरत आहे. पेमेंट साधनांमधील सर्वात व्यापक परिसंस्थेसह ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात पेटीएम ही एकूण व्यवहारांच्या संदर्भात सर्वात मोठी पेमेंट गेटवे अॅग्रीगेटर होती. ग्राहक आणि व्यापारी अशा दोन्ही बाजूंसाठी पेटीएम ही बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये पेटीएमने ५.९ अब्ज मर्चंट व्यवहार नोंदवले आहेत. रेडसीरनुसार, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ४०३३ अब्ज जीएमव्हीसह या कंपनीकडे भारतातील सर्वात मोठे पेमेंट व्यासपीठ आहे. कंपनीच्या डीआरएचपीनुसार, ग्राहक ते व्यापारी व्यवहारांमध्ये पेटीएमचा बाजारपेठेत ४० टक्के वाटा आहे, ग्राहक ते व्यापारी वॉलेट व्यवहारांमध्ये पेटीएमचा ६५ ते ७० टक्के हिस्सा आहे. कंपनीने आयपीओच्या माहितीपत्रकात (डीआरएचपी) नमूद केल्यानुसार ग्राहक आणि व्यावसायिक या दोहोंसाठी सर्वात व्यापक पेमेंट सेवा पर्याय आहेत. त्यामुळे ऑनलाइन आणि स्टोअरमध्ये व्यापाऱ्यांना अगदी सोयीस्कररित्या, सहज आणि सुरक्षित पद्धतीने पेमेंट करता येतात, स्वीकारता येतात. आर्थिक वर्ष २०२० मध्ये पेटीएमने ५७०० स्क्रीन्ससाठी सिनेमांची तिकिटे विकली आणि रेडसीरनुसार हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बुकिंग प्लॅटफॉर्म ठरले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेची व्याप्ती भारतातील सर्व परवानाधारक पेमेंट्स बँकांच्या तुलनेत अधिक आहेत तसेच पेटीएम पेमेंट्स बँक ही भारतातील फास्टटॅगची सर्वात मोठी इश्युअर आहे.