
नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण केल्यानंतर ७५व्या स्वातंत्र्य दिनाला देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी अनेक घोषणा केल्या. २१ व्या शतकातील भारताची स्वप्न आणि आकाक्षा पूर्ण करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आपली ताकद ही आपली एकजूटता आहे. देश प्रथम, सदैव प्रथम ही आपली भावना आहे, असं म्हणाले. मी काही भविष्यवेत्ता नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा विश्वास हा देशाच्या तरुणांर आहे. माझा विश्वास देशाच्या माता-भगिनींवर आहे, देशाच्या शेतकऱ्यांवर, प्रोफेशनल्सवर आहे. ही can do जनरेशन आहे, ही प्रत्येक लक्ष्य पूर्ण करू शकते, असं पीएम मोदींनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना प्रेरित करत विकास का यही सही और अनमोल समय है... ही कविता वाचली. ते म्हणाले.... यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है। कुछ ऐसा नहीं जो कर ना सको, कुछ ऐसा नहीं जो पा ना सको, तुम उठ जाओ, तुम जुट जाओ, सामर्थ्य को अपने पहचानो, कर्तव्य को अपने सब जानो, भारत का ये अनमोल समय है, यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है। असंख्य भुजाओं की शक्ति है, हर तरफ़ देश की भक्ति है, तुम उठो तिरंगा लहरा दो, भारत के भाग्य को फहरा दो।।