
नवी दिल्लीः ७५ व्या स्वातंत्र्य दिनाला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधितकेलं. पंतप्रधान मोदींनी ९० मिनिटं म्हणजे दीड तास भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणातून अनेक घोषणा केल्या. पण पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावरून काँग्रेसने बोचरी टीका केली आहे. गेल्या ७ वर्षांपासून तेच तेच रटाळ भाषण पंतप्रधान मोदी करत आहेत, असं काँग्रेसने म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींचं भाषण म्हणजे निव्वळ बकवास आहे. 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास - और इनका बकवास' आहे, असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. तर खरं आहे. बोलायला काय लागतं. आता जुने जुमलेही सोडावे लागत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत केली आहे. पायाभूत सुविधांसाठी १०० कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. अशीच घोषणा दोन पंतप्रधान मोदींनी दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये केली होती. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाला पंतप्रधान मोदी फक्त घोषणा करतात. कुठलीही घोषणा प्रत्यक्षात येत नाही. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही तीन नवीन कृषी कायदेही मागे घेतलेले नाही, असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. गेल्या ७ वर्षांपासून देश पंतप्रधान मोदींचं तेच तेच रटाळ भाषण ऐकत आहे. छोट्या शेतकऱ्यांसह कुठल्याही क्षेत्रात काहीही काम झालेलं नाही. ते फक्त नव्या घोषणा करतात. पण वास्तवात एकही योजना दिसत नाही, असं खर्गेंनी सागितलं.