इंधन दर ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला पेट्रोल-डिझेलबाबत हा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 23, 2021

इंधन दर ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला पेट्रोल-डिझेलबाबत हा निर्णय

https://ift.tt/3hYd9sq
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत उलथापालथ होत असली तरी त्याची झळ अद्याप भारतात बसलेली नाही. तूर्त कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवला आहे. आज सलग १८ व्या दिवशी कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवले. आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे. आज मुंबईत एक लीटर ९६.१९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.०४ रुपये आहे. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. अमेरिकेत मंगळवारी बाजार बंद होताना ब्रेंट क्रूडचा भाव ७४.३६ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावला. त्यात ०.४४ डॉलरची वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७०.५६ डॉलर झाला. त्यात १.२७ डॉलरची वाढ झाली होती.मेक्सिकोच्या आखातातील तेल उत्पादक काही युनिट्स या वर्षाच्या अखेरीस इडा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे ऑफलाइन राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय,अमेरिकेच्या चलनामुळे डॉलरची किंमत असलेले तेल इतर चलनधारकांसाठी फायदेशीर ठरले. चिनी मालमत्ता विकासक एव्हरग्रांडेच्या पतस्थितीच्या भयामुळे वित्तीय बाजारपेठेत भीतीची लाट पसरली आणि मागणी कमी झाल्याने सोमवारी तेलाची किंमतीत घसरण झाली होती. फेडरल रिझर्व्ह धोरणाच्या बैठकीपूर्वी बाजारपेठा सावध राहतील अशी अपेक्षा आहे.