याला म्हणतात संस्कार! रितेश देशमुखच्या चिमुकल्यांनी जिंकली नेटकऱ्यांची मनं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 11, 2021

याला म्हणतात संस्कार! रितेश देशमुखच्या चिमुकल्यांनी जिंकली नेटकऱ्यांची मनं

https://ift.tt/2X7NTs6
मुंबई- मराठीसोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा मराठमोळा अभिनेता आणि अभिनेत्री यांची जोडी नेटकऱ्यांचीआवडती आहे. रितेश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. परंतु, आता मात्र रितेशने नाही तर त्याच्या दोन चिमुकल्या मुलांनी नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. रितेशने नुकताच चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याची दोन्ही मुलं आरती म्हणताना दिसत आहेत. इतर मराठी कलाकारांप्रमाणे रितेशच्या घरी देखील आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलिया यांची दोन्ही मुलं आणि बाप्पाची आरती म्हणताना दिसत आहेत. त्या दोघांनीही खूप सुंदर असे कुरते परिधान केले आहेत. हात जोडून दोघंही बाप्पाची आरती म्हणत आहेत. रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मुलांचं कौतुक केलं आहे. मुलांसोबतच नेटकऱ्यांनी रितेशचं देखील कौतुक केलं आहे. आपली परंपरा, वारसा आपल्या मुलांना शिकवणं हे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं आणि तू ते योग्य रीतीने पार पाडतोयस, असं म्हणत नेटकऱ्यांनी रितेशचं कौतुक केलं आहे. एका युझरने प्रतिक्रिया देत लिहिलं, 'वाह, आपले सण इतक्या छान पद्धतीने मुलांना समजावून सांगणं आणि त्यांच्याकडून ते करून घेणं. खूप छान रितेश.' अशा प्रतिक्रिया देत अनेक नेटकऱ्यांनी मुलांसोबत रितेशचं कौतुक केलं आहे.