'शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका योग्यच' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 13, 2021

'शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका योग्यच'

https://ift.tt/3Em4PMH
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अशी शक्यता नाकारली असली तरी देखील काँग्रेसने हा मुद्दा लावून धरल्याचे स्पष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनीही बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेचा पनरुच्चार करत पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. यांमुळे हा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. (ncp leader should join says minister supporting statement by ) विजय वडेट्टीवार हे नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये येण्याच्या बाळासाहेब थोरात यांची भूमिका योग्य असल्याचे म्हणत पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे. आमचे नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका योग्यच आहे. आपसात काही मतभेद हे असतातच. किंवा मग टोकाची भूमिका घेण्यापेक्षा किंवा टीका करण्यापेक्षा आपली विचारधारा एकच असल्याने शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये यावे आणि पक्षाची शक्ती वाढवावी, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा- 'ओबीसींच्या हक्काचे वगळून पुढे जाणे शक्य नाही' राज्यातील ओबीसींना आपल्या हक्कांची जाणीव झाली असून ते पूर्णपणे जागृत आहेत. यामुळे ओबीसींच्या जे हक्काचे आहे ते वगळून पुढे जाणे आता कोणालाही शक्य नसल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने फक्त ५ जिल्ह्यांनाच निवडणूक घेण्यासाठी पत्र पाठवले असल्याचेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सर्वजण प्रयत्नशील असून ओबीसींना आरक्षण मिळावे अशी प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी ठरवल्यास पक्षीय पातळीवर निवडणुकीत ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ओबीसी उमेदवारी द्यावेत असाही एक मार्ग असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आता ओबीसी उमेदवार विरुद्ध ओबीसी उमेेदवार असेच सामने रंगलेले दिसतील, असेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-