राष्ट्रवादीच्या नेत्यांना जावयांमुळे 'सासूरवास'; आता मुश्रीफ अडचणीत! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 22, 2021

राष्ट्रवादीच्या नेत्यांना जावयांमुळे 'सासूरवास'; आता मुश्रीफ अडचणीत!

https://ift.tt/2W0iuaP
कोल्हापूर: सध्या राज्यात सुरू असलेल्या केंद्र आणि राज्य यांच्या संघर्षात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना खुद्द त्यांच्या जावईबापूमुळेच घाम फुटला आहे. ईडी, सीबीआय आणि एनसीबीने अनेक जावईबापूंना अटक करत कारवाईचा बडगा उगारल्याने त्याला तोंड देताना सासऱ्यांच्या तोंडाला फेस येत आहे. राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ आता ग्रामविकास मंत्री यांच्या जावयावर घोटाळ्याचा आरोप झाला आहे. विशेष म्हणजे हे सारे एकाच पक्षाचे नेते असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढत आहे. ( ) वाचा: भाजपचे नेते यांनी सोमवारी कराड येथील पत्रकार बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला. या घोटाळ्यात त्यांचे जावई मतीन मंगोली यांचा समावेश असल्याचे सांगताना मंगोली हे ब्रिक्स इंडिया या बेनामी कंपनीचे मालक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कंपनीने गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना चालविण्यास घेतला होता. मुश्रीफ यांनी हा आरोप फेटाळला असला तरी या आरोपामुळे ते सध्या तरी वादात अडकले आहे. सोमय्या यांच्या या आरोपानंतर मुश्रीफ यांनी दीडशे कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांवर झालेल्या कारवाईत हे नेते त्यांच्या जावयांमुळे अडचणीत आल्याचे दिसत आहे. वाचा: राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध हा संघर्ष टोकाला गेला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीचे चार नेते जाळ्यात सापडले आहेत. त्यामध्ये मलिक, खडसे, देशमुख आणि मुश्रीफ यांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली. भाजपमधून खडसे यांनी राष्ट्रवादीत येत हातात घड्याळ बांधले. त्यानंतर जुलै महिन्यात त्यांचे यांचे जावई गिरीष चौधरी यांना भोसरी जमीन घोटाळ्यात इडीने अटक केली. २०१६ मध्ये खडसे महसूल मंत्री असताना ३१ कोटींची एमआयडीसीची जागा केवळ ३ कोटी ७५ लाखाला विकत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर शंभर कोटीच्या लेटरबाँब प्रकरणात अडचणीत आलेल्या देशमुख यांचे जावई गौरव चतुवेर्दी यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलाविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली पण नंतर या प्रकरणात पुढे काही झाले नाही, मात्र दोन दिवस चर्चा भरपूर झाली. या तीन प्रकरणांत राष्ट्रवादीची बदनामी होत असताना आता सोमय्या यांनी मुश्रीफांच्या जावयावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. यापुढे जात आता भाजपने काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता काँग्रेसच्या गोटातही खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीत अस्वस्थता ज्येष्ठ नेते यांनी अतिशय धूर्त राजकीय खेळी करत राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे पहिल्या दिवसापासून भाजप राष्ट्रवादीच्या मागे लागला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच टार्गेट केले जाणार आहे. यामुळे मात्र राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थता पसरली आहे. जावयांवर आरोप, नेते गोत्यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान... ड्रग्ज प्रकरण अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी... शंभर कोटींचा लेटरबाँब एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी... जमीन घोटाळा हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली... साखर कारखाना घोटाळा वाचा: