सलग दोन पराभवांमुळे मुंबई इंडियन्सवर ओढवली नामुष्की, गुणतालिकेतील घसरणीमुळे रोहितचे टेंशन वाढले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 24, 2021

सलग दोन पराभवांमुळे मुंबई इंडियन्सवर ओढवली नामुष्की, गुणतालिकेतील घसरणीमुळे रोहितचे टेंशन वाढले...

https://ift.tt/3lRfnuK
आबुधाबी : मुंबई इंडियन्सला आता सलग दोन धक्के बसले आहे. या दोप पराभवांमुळे मुंबईची गुणतालिकेत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ एवढ्या खालच्या स्थानी गुणतालिकेत गेल्याचे पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे टेंशन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या चार संघांमध्ये पाहण्याची सर्वांनाच सवय झाली आहे. पण आताच्या सलग दोन पराभवांमुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर नामुष्की ओढवली आहे. कारण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा चौथ्या स्थानावर होता. या सामन्यात केकेआरकडून मुंबईला मोठा पराभव पत्करावा लागला आणि याचा फटका त्यांना गुणतालिकेत बसल्याचे पाहायला मिळाले. कारण या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ थेट सहाव्या स्थानावर घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या सामन्यात केकेआरने दमदार विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय होता. त्यामुळे केकेआरचे आता आठ गुण झाले आहेत, त्याचबरोबर दोन विजयांमुळे त्यांचा रनरेट चांगला असून त्यांनी चौथे स्थान पटकावले आहे. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या रनरेटवर मोठा परीणाम झाला आहे. त्यामुळे केकेआर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यासारखेच आठ गुण असूनही मुंबई इंडियन्सचा संघ हा सहाव्या स्थानावर गेला आहे. आता मुंबई इंडियन्सचे ९ सामने झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईचे पाच सामने बाकी आहेत. जर मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना पाचपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल, तर त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होऊ शकते. जर मुंबईला तीन विजय मिळवता आले तरीही त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल, पण त्यावेळी अन्य संघांची गुणतालिकेत काय परिस्थिती आहे, हे पाहावे लागेल. कारण तीन विजय मिळवल्यावर त्यांचे प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित होऊ शकणार नाही. केकेआरच्या पराभवानंतर रोहितने गुणतालिकेबाबतही भाष्य केले होते. आता मुंबई इंडियन्सच्या संघासाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे, हे मात्र निश्चित आहे.