बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; कोर्टाने दिले 'हे' आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 24, 2021

बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; कोर्टाने दिले 'हे' आदेश

https://ift.tt/3CCRI7W
औरंगाबाद: युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष याच्यावर दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी’ अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली तपास केल्याचे दिसत आहे. फिर्यादी तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. फिर्यादीलाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून ठाण्याच्या निरीक्षकांनी तपास करावा. पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ( Updates ) वाचा: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर , जि. बीड) याच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पीडित तरुणी उच्चशिक्षित असून बायजीपुरा भागात भाड्याने राहते. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख याने कारमध्ये अत्याचार केला. आपण प्रतिकार केला. मात्र, तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेचे आरोप मेहबूब शेख याने समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले होते. वाचा: पोलिसांनी तपास करून या प्रकरणात तथ्य नसून पीडिता आणि आरोपी यांची भेट झाल्यावरही शंका उपस्थित केली होती. सीसीटिव्हीत दोघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. त्यावरून पोलिसांकडून ‘बी समरी’ अहवाल सादर करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून अहवाल फेटाळला. सहायक पोलीस आयुक्त यांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी अॅड. आय. डी. मणियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या ‘बी समरी’ अहवालात योग्य ते पुरावे जोडलेले नाही. त्यामुळे अहवाल स्वीकारणे योग्य नसून हा अहवाल रद्द करावा, असे सहायक सरकारी वकील यांनी न्यायालयात सांगितले. वाचा: