मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; कारचा चुराडा, दोघे गंभीर जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 6, 2021

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; कारचा चुराडा, दोघे गंभीर जखमी

https://ift.tt/3kX9H1H
बंडू येवले । लोणावळा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देहूरोडच्या हद्दीत एर्टिगा कारची पुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला मागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास देहूरोड जवळील किवळे गावच्या हद्दीत झाला आहे. () आसावरी जोशी ( वय २६) आणि सागर तळशिलकर (वय ५३) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी आणि तळशिलकर एर्टिगा कारने मुंबईहून पुण्याकडे जाताना त्यांच्या गाडीची पुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला मागून जोरात धडक बसली. या भीषण धडकेत कारचा चुराडा झाला असून, या घटनेत कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. वाचा: आसावरी जोशी ह्या जर्मनीवरून मुंबईत आल्या होत्या. त्या एर्टिगा कारने मुंबईहून सातारा येथे त्यांच्या खासगी कारणासाठी जात होत्या. गहुंजे ते किवळे दरम्यान त्यांच्या कारची पुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला मागून जोरात धडक बसून हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत अपघातातील जखमींना तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. वाचा: