पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन देत राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 6, 2021

पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन देत राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले...

https://ift.tt/3DOG3UV
मुंबईः 'आमचं तीन पक्षांचं सरकार असलं तरी आम्हाला बहुमत आहे. तरीही तुम्हाला राज्यात तुमचं सरकार यावसं वाटतं. याला राजकारण म्हणतात. हेच दुसऱ्या कोणी केलं तर पाठीत खंजीर खुपसणं. तुम्ही भल्या पहाटे पवारांसोबत शपथ घेतली ते राजकारण. हेच दुसरं कोणी केलं असतं तर पाठीत खंजिर खुपसणं असं होत नाही,' अशा शब्दांत शिवसेना खासदार (Sanjay Raut) यांनी भाजपवर (Bjp) जोरदार टीका केली आहे. संजय राऊत आज मुंबईत प्रसारमाध्यांसोबत बोलत होते. त्यावेळी त्यांनी बेळगाव महापालिका निवडणूक, प्रकरण व भाजपबाबत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली आहे. कोथळा काढण्याच्या विधानावर संजय राऊतांवर तक्रार दाखल करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 'पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. समोरुन वार करण्याची आमची परंपरा आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांना खरंतर आम्ही शिवचरित्र पाठवून देऊ. त्यांनी ते वाचलं तर कोथळा काढणं म्हणजे काय हे त्यांना कळेल आणि त्यावर आम्ही चर्चा करू,' असा टोला लगावला आहे. वाचाः 'राजकारणात कोणी साधुसंत असतं का. आमचं तीन पक्षांचं सरकार असलं तरी आम्हाला बहुमत आहे. तुम्हाला सरकार यावसं वाटतं. याला काय म्हणतात हे राजकारण आहे. दुसऱ्या कोणी केलं तर पाठीत खंजीर खुपसणं. तुम्ही भल्या पहाटे पवारांसोबत शपथ घेतली ते राजकारण हेच दुसरं कोणी केलं असतं तर पाठीत खंजिर खुपसणं. देशभरात अशा गोष्टी सुरू असतात. मध्य प्रदेशात माधवराव शिंदेंचे सुपुत्र ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजकारण आणि दुसरं कोणी केलं तर पाठीत खंजीर खुपसणं. हे शब्द आता राजकारणात वापरले जाऊ नये. हे पारदर्शक राजकारण म्हणता येणार नाही,' अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे. वाचाः अनिल देशमुख प्रकरणी वेट अँड वॉच 'अनिल देशमुख यांना पहिल्यांदा नोटीस आली नाहीये. देशातील अनेकांना लूकआऊट नोटिस येत असतात. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर मी बोलणार नाही. ते कायदेशीर मार्गानं लढा देत आहेत. तुम्ही फक्त वेट अँड वॉच ठेवा,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वाचाः