नवी दिल्लीः गुजरात भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत संरक्षण मंत्री आणि भाजप नेते यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींवर आपली ऊर्जा आणि वेळ एका मर्यादेपर्यंतच खर्च करायला हवी. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण आपल्या विरोधकांचा सन्मान केला पाहिज. पण त्यांच्यावर आपली ऊर्जा आणि समय एक मर्यादेपर्यंत खरच् करायला पाहिजे. विरोधकांवर हात धुवून कुणी मागे लागलं तर त्याचा परिणाम '' असा होता, अशी टीका राजनाथ सिहांनी केली. काँग्रेस आणि राहुल गांधींनी अनावश्यक राफेल लढाऊ विमानांचा मुद्दा उचलला. त्याचा परिणाम काय झाला? राफेल विमान फ्रान्समध्ये तयार झालं आहे. भारतात लँडही केलं आहे. पण अजूनही राहुल गांधी 'Take off' करू शकले नाहीत. एक 'Rag Tag Coalition'बनवण्यात येत आहे. लोकशाहीत विरोध करण्यात काहीच हरकत नाही. पण फक्त विरोधासाठी विरोध करण्याचा प्रयत्न केला जातोय. यातूनच संसदेचं संपूर्ण पावसाळी अधिवेशन चालू दिलं गेलं नाही, असं म्हणत राजनाथ सिंहांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. देशाची धोरणं आखताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ कसा पोहोचेल हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. काँग्रेसने गांधीजींच्या नावाचा दुरुपयोग केला. एवढचं नव्हे तर गांधी नावही ठेवलं. पण गांधीजींचं काम सोडून दिलं. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास हाच भाजप आणि जनसंघाचा मूळ मंत्र आहे. मानवता आणि अंत्योदयाचे विचार आपल्याला पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी राजकीय परंपरा आणि संस्काराच्या रुपाने दिली आहे, असं राजनाथ म्हणाले. राजनाथ सिंह यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. गुजरातमध्ये भाजपच्या दीर्घकाळ यशाचे कारण 'लोक लाडके' पंतप्रधान मोदी आहेत. आधी १३ वर्षे मुख्यमंत्री म्हणून आणि आता ७ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी मोठी कामगिरी केली आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.