सोमय्यांचं स्वागत करा, असं सांगताच मुरगूडकरांनी केली 'अशी' तयारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 25, 2021

सोमय्यांचं स्वागत करा, असं सांगताच मुरगूडकरांनी केली 'अशी' तयारी

https://ift.tt/2XSIE0a
म. टा. प्रतिनिधी । भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुरगुड बंदी घालण्याचा निर्णय नगरपालिकेने मागे घेतला आहे. मात्र, मुरगूडमध्ये काळे झेंडे लावून त्यांचा निषेध करण्यात येणार आहे. ते ज्या मार्गावरून मुरगूडमध्ये येणार आहेत, त्या मार्गावर सर्वत्र काळे झेंडे लावण्यात येणार असून त्यांच्या विरोधाला किंवा स्वागताला कुणीच उपस्थित राहणार नसल्याचे मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर सोमय्या यांच्या विरोधात जिल्ह्यात जोरदार पडसाद उमटले. प्रशासनाने त्यांना जिल्हाबंदी घातल्यानंतर मुरगुड नगरपालिकेनेही सर्वसाधारण सभेत सोमय्या यांना कायमची शहरात प्रवेश बंदी घालण्याचा ठराव संमत केला. त्यानंतर ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांनी सोमय्या यांना विरोध करू नका, त्यांचे स्वागत करा, असा अशा सूचना दिल्यानंतर मुरगुड पालिकेने पूर्वी केलेला ठराव मागे घेतला. वाचा: सोमय्या हे २८ सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहेत. मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये ते मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत फिर्याद देणार आहेत. ते ज्या मार्गावरून येतील त्या मार्गावर काळे झेंडे लावण्याचा निर्णय मुरगूड नगरपालिकेने घेतला आहे. यामुळे एकीकडे दुर्लक्ष करत सोमय्या यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवताना दुसरीकडे मात्र त्यांचा निषेधही करण्याचा निर्णय मुरगूडकरांनी घेतला आहे. यासंदर्भात मुरगुडचे नगराध्यक्ष जमादार यांनी सांगितले की, सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटना सारखे फिरत न बसता चिथावणीखोर भाषण करता घेऊन जावे. त्यांनी चिथावणीखोर भाषण केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. वाचा: