आश्चर्यकारक! आकाशातून पडला चक्क सोनेरी दगड, उस्मानाबादच्या घटनेनं खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 25, 2021

आश्चर्यकारक! आकाशातून पडला चक्क सोनेरी दगड, उस्मानाबादच्या घटनेनं खळबळ

https://ift.tt/3kF475h
उस्मानाबाद : सध्याच्या कलयुगात काय होईल याचा काहीच भरवसा नाही. असाच एक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशिम येथे घडला आहे. शहरानजीक असलेल्या एका शेतामध्ये आकाशातून सोनेरी दगड पडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी शेतकरी आपल्या शेतीमध्ये काम करत असतानाच अचानक आकाशातून एक दगड खाली पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या बातमीमुळे सोशल मीडियावरही तुफान चर्चा आहे. हा दगड काही साधासुधा नसून चक्क सोनेरी रंगाचा दगड असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा दगड दोन किलो वजनाचा असून सोनेरी रंगाचा आहे. शेतकरी जिथे काम करत होता तिथून अवघ्या सात ते आठ फुटांवर हा दगड पडला. त्यामुळे शेतकरी थोडक्यात बचावला असंच म्हणता येईल. ही घटना घडल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली तर सध्या हा दगड तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. निवृत्त माळी असं शेतकऱ्याचे नाव असून माळी आपल्या शेतीमध्ये काम करत असताना ही घटना घडली. खरंतर, उस्मानाबादमध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता माळी यांच्यासोबत ही घटना घडली. घडलेल्या घटनेमुळे माळी खूप घाबरले होते. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात याची माहिती दिली. सध्या दगडाची प्राथमिक तपासणी सुरू असून भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तर यातून हा उल्कापात असल्याची माहिती भूवैज्ञानिकांकडून देण्यात आली आहे. दगडाचं वर्णन करायचं झालं तर याची ७ इंच याची लांबी असून ६ इंच रुंदी आहे तर वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार याची जाडी साडेतीन इंचापेक्षाही जास्त आहे.