शरद पवार-नितीन गडकरी शनिवारी एकाच व्यासपीठावर; भाजपचे नेते म्हणतात... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 30, 2021

शरद पवार-नितीन गडकरी शनिवारी एकाच व्यासपीठावर; भाजपचे नेते म्हणतात...

https://ift.tt/3kVLKt0
अहमदनगर: माझ्या मंत्रालयाकडे पैशाची कमतरता नाही आणि मला कोणाला पैसा मागावा लागत नाही, असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना सोबत घेण्यात आले होते. आता नगरमध्ये होणाऱ्या अशाच एका कार्यक्रमात गडकरी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एका व्यासपीठावर येत आहेत. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पवार यांना बोलविण्याची सूचना स्वत: गडकरी यांनीच केल्याचे सांगण्यात आले. (, to share dais) अहमदनगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण २ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. नगर शहराजवळ केडगाव परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पवार आणि गडकरी एकत्र येत आहेत. नगर शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चांची महामार्गांची कामे मंजूर झालेली आहेत. त्यांचे भूमिपूजन या दिवशी होणार आहे. यामध्ये नगर-करमाळा हा महामार्गा चार पदरी होणार आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सावळीविहिर ते नगर बायपास रुंदीकरण, नगर-भिंगार रस्ता रुंदीकरण यासह राष्ट्रीय राखीव निधीतून दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नगर-दौंड, नगर- कडा- जामखेड, कोपरगाव वैजापूर अशा काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचे औपचारिक उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत, असेही गंधे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी सुनील रामदासी, सचिन पारखी, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक उपस्थित होते. पवार व गडकरी यांच्या एकत्र येण्याबद्दल गंधे म्हणाले, ‘याला राजकीय किंवा पक्षीय संदर्भ नाही. गडकरी यांच्या सूचनेनुसारच पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. विकासकामे करताना राजकारण आणि पक्षीय मतभेद दूर ठेवावेत. सर्वांना सोबत घेऊन काम करावे, ही गडकरी यांची पद्धत आहे. त्यानुसार हा कार्यक्रम होत आहे.’ पुण्यात झालेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी अनेक महामार्ग, मेट्रो तसेच नव्या शहरांचीही संकल्पना मांडली होती. त्यामध्ये पुण्याचे विस्तारीत शहर आणि औद्योगिक हब नगर जिल्ह्यात उभारले जाऊ शकते, असेही गडकरी यांनी सूचविले होते. त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील कार्यक्रमात गडकरी नवीन कोणते प्रकल्प देणार आणि पवारांना सोबत घेऊन कार्यक्रम करण्याचा त्यांचा उद्देश काय असावा, याकडे लक्ष लागले आहे. वाचा: