अमेरिकेसहीत चार देशांच्या पहिल्या 'क्वाड' संमेलनात सहभागी होणार पंतप्रधान मोदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 14, 2021

अमेरिकेसहीत चार देशांच्या पहिल्या 'क्वाड' संमेलनात सहभागी होणार पंतप्रधान मोदी

https://ift.tt/3hu9fHw
नवी दिल्ली : आणि अमेरिकेसहीत चार देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'क्वॉड' या संघटनेच्या संमेलनात सहभागी होणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय. क्वॉड संमेलनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. ( PM Narendra Modi in Quad leaders Summit 2021) २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाच्या निमित्तानं भारत, , आणि या राष्ट्रांचे प्रमुख पहिल्यांदाच प्रत्यक्षरित्या एकमेकांसमोर बसून चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत या संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन तसंच जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हेदेखील सहभागी होणार आहेत. अमेरिकेच्या 'व्हॉईट हाऊस'मध्ये बसून हे चारही नेते एकमेकांशी संवाद साधतील. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी एका पत्रकार परिषदेत 'क्वॉड लीडर्स समिट'ची घोषणा केलीय. राष्ट्रपती जो बायडन पहिल्यांदाच क्वॉड शिखर संमेलनाचं यजमान पद भूषवणार आहेत. या निमित्तानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर जो बायडन यांची दुसऱ्यांदा मोदींशी प्रत्यक्ष भेट होणार आहे. कोविड संक्रमण काळात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा परदेश दौरा आहे. याअगोदर त्यांनी कोविड काळात बांग्लादेशला भेट दिली होती. कोविड संक्रमण, हिंद प्रशांत महासागर क्षेत्र, सायबर स्पेस तसंच तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या चारही देशांत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतंय. या संमेलनानंतर २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करण्याची शक्यता आहे. क्वॉड ही चीनविरोधी राष्ट्रांची हातमिळवणी असल्याची टीका विरोधकांकडून बऱ्याचदा केली जाते. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी क्वॉडला 'एशियन नाटो' म्हणूनही संबोधलं होतं. 'नाटो' ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युरोपीयन देशांचं तयार करण्यात आलेली सैन्य संघटना आहे. परंतु, विरोधकांचे आरोप भारतासहीत इतर सदस्य देशांकडून अनेकदा फेटाळण्यात आले आहेत.