अहमदाबादः गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एका महिलेने एका किशोरवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी खोटं बोलत नाहीए ना, हे सिद्ध करण्यासाठी महिलेने शेजारच्या एका ११ वर्षांच्या . या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लखी मकवाना (४०) ला गुरुवारी अटक केली, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. ही घटना पाटणच्या संतालपूर शहरात बुधवारी घडली. गुजरात बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष जागृतीबेन पंड्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत पीडित मुलीचा उजवा हात पोळल्याचं दिसून येत आहे. तसंच वेदनांमुळे ती रडत असून काय झालं ते सांगत आहे. या पीडित मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत केली अटक पाटण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसंच जिल्हा बालहक्क सुरक्षा अधिकाऱ्यांना पीडित मुलीच्या घरी जावं आणि तिच्यावर कशा प्रकारे उपचार सुरू आहेत याची माहिती घ्यावी, असे आदेश आपण दिले आहे. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनीही आपल्या बाजूने चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्याची माहिती पंड्या यांनी दिली. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला आणि पीडित मुलगी हे शेजारी आहेत. जवळपास १० दिवसांपूर्वी मुलीने घराबाहेर एका अज्ञात व्यक्तीसोबत आरोपी महिलेला बोलताना पाहिलं होतं, असं तपासातून समोर आल्याचं पोलिस उपनिरीक्षक एन. डी. परमार यांनी सांगितलं. पीडित मुलीचे आई-वडील हे बुधवारी सकाळी घरी नव्हते. आपण अज्ञात व्यक्तीसोबत बोललो, हे इतर कुणाला सांगितलं तर नाही ना, हे आरोपी महिलेने मुलीला विचारलं. मुलीने इन्कार केला. पण आरोपी महिला तिला आपल्या घरा घेऊन गेली. खोटं बोलत नाहीस ना, असं म्हणत तिचा हात उकळत्या तेलात बुडवला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. मुली पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी महिलेने तिला जीवेमारण्याची धमकी दिली आणि तिचा उजवा हात बळजबरीने उकळत्या तेला घातला.