मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना धडकी भरवणारा हा वेंकटेश अय्यर आहे तरी कोण, जाणून घ्या... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 24, 2021

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना धडकी भरवणारा हा वेंकटेश अय्यर आहे तरी कोण, जाणून घ्या...

https://ift.tt/2ZvrtCl
नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला सध्या एक धडाकेबाज युवा सलामीवीर सापडला आहे आणि तो आहे वेंकटेश अय्यर. कारण मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या दोन्ही बलाढ्या संघांविरुद्ध वेंकटेशने अर्धशतकं झळकावत केकेआरच्या विजया सिंहाचा वाटा उचचला आहे. त्यामुळे हा वेंकटेश अय्यर आहे तरी कोण, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. वेंकटेश आज मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळताना दिसतोय, तो त्याच्या आईमुळे. कारण त्याच्या आईनेच वेंकटेशला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. पाल मुलांना अभ्यास करण्यासाठी खेळ सोडायला सांगतात, पण वेंकटेशच्या आईने असे कधीच केले नाही, उलट वेंकटेशला क्रिकेट खेळण्यासाठी तिने बऱ्याचदा मदतही केली आहे. वेंकटेश हा मध्य प्रदेशचा. स्थानिक क्रिकेटमध्ये वेंकटेशने दमदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या संघाचे त्याने नेृतृत्वही केले. एक धडाकेबाज फलंदाज आणि चाणाक्ष कर्णधार म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. त्यामुळेच कोलकाता नाइट रायडर्सच्या टॅलेंट सर्च करणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीपथात वेंकटेश आला. कोलकाताच्या संघाने फक्त त्याला आपल्या संघात घेतले नाही तर त्याला सलामीला पाठवण्याचे धाडसही दाखवले. कारण आतापर्यंत कोलकाताच्या संघाने नितीष राणापासून राहुल त्रिपाठीपर्यंत बऱ्याच खेळाडूंना सलामीला पाठवले होते. पण आता वेंकटेशसारख्या युवा खेळाडूला सलामीला पाठवण्याचा धाडसी निर्णय कोलकाताच्या संघाने घेतला आणि वेंकटेशने या संधीचे सोने करून दाखवले. युएईमध्ये कोलकाताच संघ दाखल झाला तेव्हा वेंकटेश अय्यर आहे तरी कोण, हे कोणाच्या गावीही नव्हते. पण आरसीबीविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात वेंकटेशने आपली चमक दाखवून दिली. पण ही खेळी फ्ल्यूक नसल्याचे वेंकटेशने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले. कारण मुंबई इंडियन्सच्या संघात जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्टसारखे जगविख्यात गोलंदाज होते. पण वेंकटेशने या दादा गोलंदाजांचे दडपण घेतले नाही, उलट तो त्यांच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन सामन्यांमध्ये वेंकटेशने दोन अर्धशतकं झळकावली आहेत, त्यामुळे आता त्याच्याकडून संघाच्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असतील.