ठाण्यातील 'तो' अपघात दुचाकी घसरल्याने - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 23, 2021

ठाण्यातील 'तो' अपघात दुचाकी घसरल्याने

https://ift.tt/2XCSQcw
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः घोडबंदर रस्त्यावर मंगळवारी दुपारी दुचाकी घसरून दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वार मोहम्मद फैजल अल्लाबक्ष बाडवाले (२३) या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात खड्ड्यामुळे झाल्याची चर्चा होत असली तरी याला पोलिसांकडून कोणताही दुजोरा मिळू शकला नाही. कारण, प्रत्यक्ष अपघात कसा झाला हे बघणारे कोणी साक्षीदार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये राहणारा मोहम्मद मंगळवारी दुपारी दुचाकीवरून जात होता. घोडबंदर रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील गायमुख जकात नाक्याजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. दुचाकी घसरल्याने दुभाजकावर जाऊन आदळली. हेल्मेट घातले नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. इतरही ठिकाणी दुखापत झाली होती. तात्काळ त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. तो दुपारी कोठे चालला होता याबाबत काही कळू शकले नाही. दरम्यान, घोडबंदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसाठी हा रस्ता खूपच धोकादायक झाला आहे.